छत्तरपूर संस्थान
छत्तरपूर संस्थान : मध्य प्रदेश राज्यातील एक जुने संस्थान. क्षेत्रफळ २,७९७ चौ.किमी. लोकसंख्या सु. पावणेदोन लाख (१९४१). उत्पन्न सु. साडेसात लाख रुपये. उत्तरेस हमीरपूर जिल्हा व चरखरी संस्थान, पूर्वेस केन नदी, पश्चिमेस बिजावर-चरखरी संस्थाने, दक्षिणेस बिजावर-पन्ना संस्थाने व दमोह जिल्हा यांनी ते सीमित झाले होते.